गंगापूर: गंगापूर-वैजापूर रोडवरील जाखमाथा येथे भीषण अपघात; ८ जखमी, दोघांची प्रकृती गंभीर <nis:link nis:type=tag nis:id=Viral nis:value=Viral nis:enabled=true nis:link/>
आज शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की गंगापूर-वैजापूर रोडवरील जाखमाथा परिसरात दोन फोर व्हीलर गाड्यांमध्ये समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात एकूण ८ जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे, अनिकेत मुळक आणि भैय्या यादव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून तातडीने गंगापूर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.