जिल्ह्यात अंमली पदार्थांची अवैध विक्री रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कारवाई करत दोन ड्रग्ज तस्करांना काल दि 4 डिसेंबर ला 9 वाजता अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून MD Drugs एमडी (मेफेड्रॉन) ड्रग्ज पावडर तसेच मोटारसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹2,00,230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.