गोंदिया: चंद्रभागा स्कूल जवळ कुंभारेनगर येथे काठीने व जर्मन करचीने मारहाण, शहर पोलिसात गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Nov 27, 2025 दि.24 नोव्हेंबरच्या 7:30वाजेच्या सुमारास चंद्रभागा स्कूल जवळ कुंभारेनगर येथे आरोपी गोलू खत्री व इतर यांनी संगणमत करून फिर्यादीस आरोपी गोलू खत्री याने तू माझा मकान का खाली करीत नाही असे बोलून काठीने उजव्या खांद्यावर मारले तर यातील दोघा आरोपींनी फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारपीट केले व जर्मन करचीने फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केले.फिर्यादीस मकान खाली केला नाही तर जीवाने ठार मारीन अशी धमकी देऊन शिवीगाळ केल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून दि. 26 नोव्हेंबरला 2 वा.गुन्हा दाखल करण्यात आला