सातारा: कोषागार कार्यालय सातारा येथे पेन्शन मेळावा संपन्न, जिल्ह्यात 35 हजार पेन्शन धारकांची संख्या
Satara, Satara | Nov 11, 2025 निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्यासाठी कोषागार कार्यालय, सातारा येथे आज सकाळी 12.00 वाजता पेन्शन मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे आयोजन कोषागार अधिकारी सौ. आरती नांगरे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या मेळाव्यात उपस्थित निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित विविध प्रश्न, तक्रारी तसेच शंका निरसनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पेन्शनधारकांना शासनाच्या नव्या योजना व सुविधांची माहिती देण्यात आली.