कराड: पाल खंडोबा मंदिर सोमवारपासून सात दिवस राहणार बंद; वज्रलेपासाठी भक्तांची तात्पुरती गैरसोय
Karad, Satara | Nov 6, 2025 पाल येथील प्रसिध्द श्री खंडोबा देवस्थानात सोमवार, दिनांक १० नोव्हेंबर ते रविवार, १६ नोव्हेंबर या कालावधीत वज्रलेपाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या काळात मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. मंदिर समितीने गुरुवारी सकाळी दहा वाजता दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण आणि सौंदर्यवृद्धीसाठी हे काम करण्यात येत आहे. खंडोबा मंदिर हे पालसह संपूर्ण राज्यातील भक्तांचे श्रद्धास्थान असून, दररोज तसेच पौर्णिमा आणि शनिवार, रविवारच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते.