हिंगणघाट: अल्पवयीन पिडितेला अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने सुनावणी ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन पिडितेला अश्लिल शेरेबाजी करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असुन १० हजार रुपये दंड ठोठावल्याची माहिती सरकारी वकील ॲड दिपक वैद्य यांनी प्रसिद्ध पत्रातून दिली आहे. पिडिता ही तिच्या घराजवळील दुकानातून घरी परत येत असतांना रस्त्यामध्ये आरोपीने तिच्यावर अश्लिल शेरेबाजी केल्यामुळे तिच्या मनावर विपरित परिणाम होवून तिने फिनाईलची बॉटल पिवून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.होता