अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखडे यांनी आज ५ डिसेंबर शुक्रवार रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये संसद भवन येथे बोलताना अमरावतीशी संबंधित एका अतिशय गंभीर मुद्द्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अमरावती रेल्वे स्टेशन - जे ब्रिटीश काळातील वारसा असून शहराच्या आर्थिक, सामाजिक आणि नागरी विकासाच्या केंद्रस्थानी आहे - ते स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर त्यांनी कडाडून टीका केली.