लोणार सारख्या जागतिक पर्यटन स्थळ,सुसंस्कृत व प्रगतशील शहराला स्वच्छ, सुंदर व आरोगयुक्त बनवायचे असेल तर भारतीय जनता पार्टी हाच एकमेव पर्याय असल्याचे प्रतिपादन भाजपा च्या स्टार प्रचारक तथा मंत्री पंकजाताई मुंढे यांनी केले. नगरपालिका निवडणूक प्रचारादरम्यान पंकजाताई मुंढे यांनी शहरातील दी ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय येथील जाहीर सभेत सांगितले तसेच त्यांनी सभेत भाजपाच्या सर्व उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन केले आहे.