मद्याच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्या एका तरुणाला संतापलेल्या दोघांनी मिळून समजावण्यास गेलेल्या तरुणावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला, ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता शिरसोली प्र.बो. (ता. जळगाव) येथे घडली. याप्रकरणी मंगळवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गोकूळ आणि यश चौधरी या दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.