कुही: वडद शिवारात अवैधरित्या मोहफुल दारुभट्टीवर कुही पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Nov 11, 2025 पोलीस स्टेशन कुही अंतर्गत येत असलेल्या वडद शिवारात गुप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या दारुभट्टीवर कुही पोलिसांनी धाड टाकुन 1 लाख 9 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना 11 नोव्हेंबर मंगळवरला दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीसांनी पंचासमक्ष नाशवंत मोहफुल सडवा घटनास्थळी नष्ट करण्यात आला. आरोपीविरुद्ध कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास कुही पोलीस करीत आहेत.