मोर्शी: ऊदखेड शिवारात जंगली जनावाराचा हौदोस, भरदीवसा कपासी पीकाचे नुकसान
ऊदखेड शिवारातील अनुज गवई या शेतकऱ्यांच्या शेतात जंगली डुकराने भर दिवसा हल्ला चढवून कपाशी पिकाचे नुकसान केल्याची घटना आज दिनांक 8 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता उघडकीस आली आहे. ऐन बहारात आलेल्या कपाशीची झाडे जंगली डुकराच्या हौदोसाने मोडतोड झाली असल्याने, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वनविभागाने तातडीने बंदोबस्त न केल्यास आणखी शेतकऱ्यांचे देखील नुकसान होण्याची शक्यता असल्याने ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी या शेतकऱ्याने वनविभागाकडे केली आहे