शेगाव: एकाने दोघांना मारहाण केल्याची घटना लालबाबा देवी मंदीर अकोट रोड येथे घडली
एकाने दोघांना मारहाण केल्याची घटना लालबाबा देवी मंदीर अकोट रोड येथे ११ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत संतोष दादाराव आगलावे वय 21 वर्ष रा. मासा (सिसा) ता. जि अकोला याने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, आनंद चव्हान रा. म्हैसांग ता. जि. अकोला याने मला धक्का मारला त्यावेळी मी त्याला धक्का का मारतो असे म्हटले असता त्याने मला शिवीगाळ स्टीलचे कडे मारून जखमी केले.माझा चुलत भाउ महादेव नामदेव आगलावे हा सोडविण्यास आला असता त्याला सुद्धा मारहाण केली व धमकी दिली.