सेलू: देवरी (जि. गोंदिया) येथे सेलू येथील जमादाराच्या कारला भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू
Seloo, Wardha | Nov 24, 2025 सेलू पोलीस ठाण्यात कार्यरत जमादार प्रशांत श्रीवास्तव (वय ५०) यांच्या कारला देवरी (जि. गोंदिया) येथे झालेल्या अपघातात त्यांच्या पत्नी सौ. गीता प्रशांत श्रीवास्तव (वय ४५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर जमादार श्रीवास्तव हे गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २४ नोव्हेंबरला दुपारी ३ च्या सुमारास घडली.