धामणगाव रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून आज भव्य रूट मार्च काढण्यात आला. दत्तापूर पोलीस स्टेशन येथून सुरू झालेला हा रूट मार्च शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे, तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या भागातून काढण्यात आला.रूट मार्च दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. निवडणूक काळात कोणताही अप्रिय प्रकार घडू नये, करिता रूट मार्च काढण्यात आला