इंडिगो एअरलाइन्समध्ये फ्लाइट क्रूची कमतरता भासत असल्याने बुधवारी पुणे विमानतळावरून १२ उड्डाणे रद्द करण्यात आली. नागपूर, बंगळुरू, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, कोलकाता आणि इतर शहरांकडे जाणाऱ्या विमानांवर याचा परिणाम झाला. या अचानक बदलामुळे शेकडो प्रवासी हैराण झाले.