हवेली: टिळेकरवाडीत भरदिवसा बिबट्या दिसला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण...
Haveli, Pune | Nov 7, 2025 उरुळी कांचन जवळील कोरेगाव मूळ, टिळेकरवाडी व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. शुक्रवारी (ता. 06) भरदिवसा टिळेकरवाडी (ता. हवेली) हद्दीतील चूनखडी परिसरात एका डाळींबाच्या बागेत बिबट्या मुक्तसंचार करीत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.