नाशिक: बालाजी नगर, जेल रोड उघड्या डीपीतून गेलेल्या वायरचा शॉप लागून शेळी ठार तर महिला जखमी
Nashik, Nashik | Sep 17, 2025 विद्युत विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उघड्या विद्युत डीपीतून गेलेल्या वायरचा शॉक लागून शेळी ठार झाली तर महिला जखमी झाली आहे.रूपाली फुलपगारे राहणार बालाजी नगर, पवारवाडी, जेलरोड या नेहमीप्रमाणे त्यांच्या शेळ्या चारून घरी परत जात असताना उघड्या डीपीतून गेलेल्या वायरचा शॉक शेळ्यांना लागला. रूपाली फुलपगारे यांनी तात्काळ पाच शेळ्यांपैकी चार शेळ्यांना ओढले परंतु एक शेळी ठार झाली. फुलपगारे या जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.