कर्जत शहरास पाणी पुरवठा करणारी योजना अखोनीजवळ २९ नोव्हेंबर रोजी बीएसएनलच्या केबल कामामुळे फुटली होती. यावेळी कर्जत नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करीत ती दुरुस्त करण्यात यश मिळवले असल्याची माहिती कर्जतच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांनी दिली. कर्जतकरांना झालेल्या निर्जलीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करीत उद्यापासून कर्जतचा पाणीपुरवठा नियमित होईल, अशी प्रतिक्रिया दिली.