अर्जुनी मोरगाव: गोंदिया प्रभाग क्रमांक 12 येथे प्रचार सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले संबोधित
गोंदिया नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील प्रभाग क्रमांक १२ येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी उपस्थित राहून संबोधित केले. यावेळी गोंदियाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे अधोरेखित करत, भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी आवाहन केले.