अमरावती: सोमवारी ‘युनिटी वॉक’चे आयोजन युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सोमवार,17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता युनिटी वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. विमलाबाई देशमुख सभागृहातून या रॅलीला सुरवात होणार आहे. यात युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.पदयात्रेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज ११ नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी साडे चार वाजता बैठक पार पडली. यावेळी मेरा युवा भारतच्या जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव....