लातूर: मनपा आयुक्त मानसी व उपयुक्त खानसोळे यांच्या कामाचा धडाका सुरूच,मनपाचे विशेष कर वसुली शिबिराला मोठा प्रतिसाद
Latur, Latur | Nov 30, 2025 लातूर -लातूर मनपाच्या आयुक्त मानसी व उपयुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी आपल्या कामाचा लातूरच्या महानगरपालिकेत कामाचा धडाका सुरू ठेवलेला असून लातूर शहर महानगरपालिका कर संकलन व कर आकारणी विभागामार्फत वर्षाच्या सुरुवातीपासूनच संपूर्ण कर वसुलीचे लक्ष्य ठेवून सातत्याने कर संकलनाची मोहीम राबविली जात आहे. नियमित कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना विविध सवलती दिल्यानंतरही अनेक थकबाकीदारांनी प्रतिसाद न दिल्याने मनपातर्फे जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली.