सडक अर्जुनी: मांडोदेवी देवस्थान परिसरात 'जो शिकला तो टिकला' चित्रपटाचे शूटिंग संपन्न; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार चित्रपट
मांडोदेवी देवस्थान या निसर्गरम्य व धार्मिक परिसरात राज सुंदरी फिल्म मुंबई द्वारा निर्मित मराठी चित्रपट 'जो शिकला तो टिकला' च्या शूटिंगला मोठी उत्सुकता लाभली. निर्माते-दिग्दर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील महत्त्वपूर्ण दृश्यांचे चित्रीकरण येथे पार पडले. मंदिर परिसर, सभोवतालचा डोंगराळ भाग, तसेच स्थानिक गावांचा समावेश असलेल्या विविध लोकेशन्सवर कलाकारांनी आपल्या भूमिकांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.