हवेली: बावधन पोलिसांकडून पार्थ पवार यांच्याशी संबंधित अमेडिया कंपनीचे कागदपत्र सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयातून जप्त
Haveli, Pune | Nov 7, 2025 पार्थ पवार यांच्याशी संबंधित अमेडिया कंपनीच्या जमिनीच्या खरेदी-खताशी संबंधित कागदपत्रे बावधन पोलिसांनी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय (हवेली) येथून जप्त केली आहेत. मुंढवा येथील जमीन प्रकरणाच्या तपासासाठी ही कारवाई करण्यात आली. आज दुपारी पोलिसांनी छापेमारी करून कागदपत्र ताब्यात घेतली, ज्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.