मंगरूळपीर: न.प निवडणूक 🗳️
सामूहिक जेवणावळीवर भर!
उमेदवार कार्यकर्तांसाठी करत आहे जेवणाचे आयोजन.
२५ नॉव्हेंबर रोजी प्राप्त माहीती नुसार मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीत कडाक्याच्या थंडीत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. अधिकृत जाहिर प्रचाराला अजून वेळ असला तरी विविध राजकीय पक्षांचे नगराध्यक्ष व सदस्य पदाचे उमेदवार प्रभागनिहाय मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. दिवसभर प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी आता उमेदवारांकडून सामूहिक जेवणावळींचे आयोजन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.