हवेली: मंगल कार्यालयातून लाखोंचा ऐवज लंपास, खेड शिवापूर येथील घटना
Haveli, Pune | Nov 8, 2025 खेड शिवापूर (ता. हवेली) येथील मंगलकार्यालयातील लग्नसमांरभाच्या धामधुमीत एका महिलेची पर्स चोरून त्यातील दागिने व रोख रक्कम मिळून पावणेतीन लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.