कोरेगाव: विरोधकांच्या झुंडशाहीला आमदार महेश शिंदे यांचा थेट इशारा; कायद्याच्या राज्यावर दबाव आणणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या सहा वर्षांपासून कायद्याचे राज्य आहे. सर्वसामान्य आणि गोरगरिबांना न्याय देणे, त्यांची बाजू प्रशासनापर्यंत पोहोचवणे हेच आपले कर्तव्य आहे. मात्र काही प्रस्थापित मंडळी झुंडशाहीचा वापर करून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दबाव तंत्र वापरून सामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा आमदार महेश शिंदे यांनी दिला.