नागपूर शहर: मध्य नागपुरातील रस्त्यावर डांबरीकरण झाले नाही तर मनपा आयुक्तांना फासणार काळे, काँग्रेसने दिला इशारा
नागपूर शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले असून मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी भरले असून त्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी त्रास होत आहे. दरम्यान आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी या खड्ड्यांना श्रद्धांजली वाहून निषेध आंदोलन केले. व येत्या दोन दिवसात या रस्त्यावर डांबरीकरण झाले नाही तर मनपा आयुक्तांना काळे फासणार इशाराही दिला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली.