मंगरूळपीर: आदर्श ग्राम जांभरुण!
कलश स्थापना. भाविकांमध्ये आनंदाची लहर.
आज दिनांक २९ नॉव्हेंबर २०२५ शनिवार रोजी प्राप्त माहीती नुसार मंगरुळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम जांभरुण महाली येथे असलेल्या श्री जंबूकेश्वर संस्थान मंदिरात २६ नोव्हेंबर रोजी अत्यंत भव्य व धार्मिक उत्साहात कलश स्थापना सोहळा तसेच महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यास गावातील तसेच परिसरातील हजारो भाविकांनी हजेरी लावून हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी केला.सकाळी लवकर गावातील मान्यवर व भाविकांच्या उपस्थितीत कलशाची विधीवत पूजा- अर्चना करण्यात आली..