तुमसर: स्टेशन टोली देव्हाडी येथे डिझेलची अनाधिकृतपणे साठवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील स्टेशन टोली देव्हाडी येथे दि. 10 नोव्हेंबर रोज सोमवार सायं.5.30 वाजताच्या सुमारास भंडारा स्थानीक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बाबाराव पाटील यांनी विनापरवाना ज्वलनशील डिझेलची अनाधिकृतपणे साठवणूक करणारे आरोपी ईश्वरदास हरिचंद्र वाघमारे व दिलीप हरिचंद्र वाघमारे यांच्या ताब्यातून 265 लिटर डिझेल व डिझेल साठविण्याचे साहित्य असा एकूण 28 हजार 615 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.