हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा युवानेते डा. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत जुनोना येथे अनेक युवकांनी जिल्हाप्रमुख अड. युवराज धानोरकर यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.धानोरकर यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा देऊन सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्वाचा समजल्या जात आहे.