उमरेड: उमरेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस ; दिग्गज नेत्यांच्या सभांमुळे चुरस वाढली
Umred, Nagpur | Dec 1, 2025 नागपूर जिल्ह्यातील उमरेड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून या निवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उद्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्यापूर्वी आज एक डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे.