जालना: उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना तर्फे चालक दिन साजरा; वाहनचालकांचाही केला सन्मान
Jalna, Jalna | Sep 17, 2025 उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करून वाहन चालक दिन साजरा करण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता चालक दिनाच्या कार्यक्रमात वाहन चालकांचा सन्मानही करण्यात आला. दरम्यान सकाळी शहरातील अवजड वाहन पार्किंग येथे वाहन चालकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित चालकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.