उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर आज दि ५ डिसेंबर रोजी सांयकाळी पाच वाजता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. कन्नड व मराठवाड्यातील राजकीय परिस्थितीवर बैठकीत सविस्तर विचारविनिमय झाला. आगामी राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे संकेत जाधव यांनी दिले. या भेटीमुळे कन्नड तालुक्यात नवीन राजकीय समीकरणांची चर्चा वेग घेऊ लागली आहे.