मौदा: खराडा पुनर्वसन शिवारात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे 2 वाहन मौदा पोलीसांनी पकडले
Mauda, Nagpur | Nov 10, 2025 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या खराडा पुनर्वसन शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलीसांनी अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे 2 वाहन पकडल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की मौदा पोलीसांचे पथक गस्तीवर असतांना गुप्त माहितीच्या आधारे खराडा पुनर्वसन शिवारात पाहणी केली असता 2 वाहनांमध्ये 19 जनावरे कोंबली असल्याचे आढळून आले. त्यावरून कागदपत्रे तपासणी केली असता अवैधरित्या जनावरांची वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले.2 वाहने जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.