कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश टाकळी फाटा शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या धुमाकूळीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन जीव घेतल्यानंतर नागरिकांनी आंदोलन केले होते. आजी-माजी आमदारांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने वनविभाग ‘ऍक्शन मोड’वर आला. अखेर आज बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वनविभागाच्या पथकाने हा बिबट्या बेशुद्ध करून यशस्वीरित्या जेरबंद केला. स्थानिक ग्रामस्थ दादा बाबर हे आपल्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात असताना रस्त्यालगत बिबट्या दिसला.