अमरावती महानगरपालिका समाज विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने समता सप्ताह (समान संधी दिवस) निमित्त आज ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२५ या कालावधीत “दिव्यांग आनंद महोत्सव” हा विशेष उपक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणाऱ्या वातावरणात पार पडला. हा महोत्सव शहरातील महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. १३, चपराशीपुरा येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या औपचारिक स्वागताने करण्यात आली..