भंडारा: १९ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या; अंबिका नगर परिसरातील घटना, आकस्मिक मृत्यूची नोंद
भंडारा येथील अंबिका नगर परिसरात एका १९ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वा. दरम्यान उघडकीस आली आहे. सोहम अरुण कुंभलकर (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अंबिका नगर येथील सोहम याच्या घरी ही घटना घडली. सोहम याने आपल्या घराच्या दुसऱ्या माळ्यावरील स्टोअर रूममध्ये ओढणीच्या साहाय्याने गच्चीच्या लोखंडी हुकला गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच सोहमच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी....