भाजपा आरपीआय मित्र पक्ष लोकसेवा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आज २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी आमदार स्नेहलता कोल्हे,आ. विक्रम पाचपुते,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे, ऍड.रवींद्र बोरावके उपस्थित होते.