यवतमाळ: किन्ही येथे ट्रकच्या धडकेत म्हैशी जखमी,अज्ञात ट्रक चालका विरुद्ध यवतमाळ ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी अरविंद बाबूसिंग जाधव यांच्या तक्रारीनुसार 14 सप्टेंबरला अज्ञात ट्रक चालकांनी त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या म्हशीच्या कळपाला धडक मारून जखमी केले व तेथून पळून गेला.या प्रकरणी 15 सप्टेंबरला यवतमाळ ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.