तुमसर: चिखला येथे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिला दारू विक्रेत्याविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल
तुमसर तालुक्यातील चिखला येथे दि. 10 नोव्हेंबर रोज सोमवारला दुपारी 4 वाजता च्या सुमारास गोबरवाही पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हातभट्टीची दारू विक्री करणारी महिलेला ताब्यात घेत आरोपी महिलेच्या ताब्यातील प्लास्टिक डबकीत ठेवलेली 10 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी आरोपी महिलेचे नाव पोलीस सूत्रानुसार कळाले नसून आरोपी महिलेविरुद्ध गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.