नागपूर शहर: नंदाजी नगर येथे चाकू घेऊन फिरणाऱ्या 'आलू' ला पोलिसांनी केली अटक
दोन डिसेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कोतवाली हद्दीतील नंदाजी नगर येथे चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. अटकेतील आरोपीचे नाव अक्षय कडू असे सांगण्यात आले असून त्याच्या अंग झडती दरम्यान त्याच्याकडून एक लोखंडी चाकू किंमत 300 रुपये जप्त करण्यात आले. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.