येथील ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या अर्चना कुटेंना पुणे येथून अटक
Beed, Beed | Sep 16, 2025 ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात फरार असलेल्या कुटे ग्रुपच्या संचालिका अर्चना कुटे यांना सीआयडीच्या पथकाने अखेर अटक केली आहे.छत्रपती संभाजीनगर सीआयडीची टीम पुण्यात गेली होती. तिथून अर्चना कुटे यांना मंगळवार दि.16 सप्टेंबर रोजी, सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. आता त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे.ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे हजारो ठेवीदारांचे पैसे बुडाले, तर काही ठेवीदारा