राहुरी: पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गाव खेड्यातल्या विकास कामांना गती, शिवाजी कर्डिले यांचे गणेगाव येथे प्रतिपादन
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गाव खेड्यातल्या विकास कामांना गती मिळणार गावांचा विकास होण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे. या अभियानात सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य असल्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले. गणेगाव येथे आज बुधवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.