अमरावती: इज ऑफ डुईंग बिजनेस च्या दिशेने अमरावती महानगरपालिकेचे आणखी एक पाऊल,कर आकारणी पध्दतीत सुधारणा
नागरिकांसाठी कर प्रणाली अधिक पारदर्शक, सुसंगत आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेने कर आकारणी पध्दतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. इज ऑफ डुईंग बिजनेस या उपक्रमाशी सुसंगत असा हा निर्णय मा.पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.याआधी महानगरपालिका क्षेत्रातील भाडेतत्वावरील मालमत्तांवर प्रत्यक्ष भाडेकरारातील रकमेच्या आधारे कर आकारणी केली जात होती. या पध्दतीमुळे समान क्षेत्रफळाच्या मालमत्तांमध्ये कर आकारणीतील मोठी....