समुद्रपूर: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासंबधी मोहगांव ग्रा.प.मध्ये पार पडली सभा:अभियांनात नागरीकांना सहकार्याचे आव्हान
समुद्रपूर: ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन त्या सक्षम बनाव्यात याकरिता शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.याच अनुषंगाने मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेचे अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे, तर मार्गदर्शक म्हणून ग्रामसेवक अखिलेश ढोबळे,प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच सपनाताई बाभडे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल धोटे, मुख्याध्यापक रमेश वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश महातळे, संदिप दातारकर,राजु परचाके, उपस्थित होते