लातूर: खोटे शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळविले; लातूरात शासनाची फसवणूक, पोलिसांकडे गुन्हा नोंद
Latur, Latur | Nov 30, 2025 लातूर :-खोटे शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केल्याच्या संशयावरून लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जहीर शब्बीर शेख (३२, संजय नगर, लातूर) याने नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत लातूर तहसील कार्यालयात खोटे शपथपत्र सादर करून जन्म प्रमाणपत्र केले आणि शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.