हवेली: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी काळभोर येथे अपघातात जखमी झालेल्या गवंडी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू
Haveli, Pune | Nov 10, 2025 पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने पायी चाललेल्या गवंडी कामगाराला धडक दिल्याची घटना घडली होती. ही घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मळीमळा परिसरात रविवारी (2 नोव्हेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गवंडी कामगाराची ससुन हॉस्पिटल उपचारादरम्यान मृत्यू झाला.