गोरेगाव: मतदान कामावरच होत आहे निधीवर नाही,आमदार चित्रा वाघ यांची शरद पवारांना प्रत्युत्तर,गुरुकृपा लाॅन येथे माध्यमांशी संवाद
आम्ही लोकसभेत हरलो,तर आम्ही प्रेस घेऊन कुठेही हे चुकीचे आहे, ते चुकीचे आहे. असे सांगितले नाही. तर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो. आणि आम्ही जिथे कमी पडलो त्याचे आत्मचिंतन करून ही भरारी घेतली आहे. लोक कामावरच मत देतात निधीवर देत नाही. असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी केले. शरद पवार यांनी कामावर नाही तर निधीवर मत मागितले जात आहे. अशी टीका सत्ताधाऱ्यावर केली होती. यावर प्रतिक्रिया देताना त्या बोलत होत्या.