निफाड: वाकद परिसरात दिवसा थ्री फेज विजेची मागणी
Niphad, Nashik | Nov 22, 2025 वाकद परिसरात दिवसा थ्री फेज विजेची मागणी शिरवाडे वाकद :- निफाड तालुक्यातील वाकद, कानळद, शिरवाडे परिसरात बिबट्यांचा वाढता वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वीज मंडळाकडून फक्त रात्रीच्या वेळेस थ्री फेज वीजपुरवठा केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना धोका पत्करून रात्री शेतात पाणी भरण्यास जावे लागत आहे. परिणामी, दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू करावा या मागणीचे निवेदन वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. वाकद शिवारात दररोज चार ते पाच बिबटे शेतकऱ्यांच्या नजरेस पडत असल्याच