आंबेगाव: मराठा समाजाबाबत गरळ ओकणारे हाके, वानखेडे विरोधात मराठा समाज घोडेगाव येथे आक्रमक
Ambegaon, Pune | Sep 17, 2025 आंतरजातीय विवाहासंदर्भात जातीयतेवर आधारित अवमानकारक व भडकाऊ विधाने केल्याबाबत लक्ष्मण हाके व संगिता वानखेडे यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते व मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांनी घोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन निवेदन दिले.